www.zee24taas.com, झी मीडिया, रायपूर
आजपासून चैत्र महिन्यातील नवरात्रौत्सवाला उत्सवाला सुरुवात झालीय. यावर्षी चैत्र नवरात्रीचे पहिले पाच दिवस खूपच खास आहेत. घर आणि मंदिरांत देवीच्या उपासनेसाठी विशेष घटाची स्थापना केली गेलीय.
यावर्षी सण आणि शुभ गोष्टींचाही चांगला योगायोग आहे. शेवटचा दिवस म्हणजेच नवमी पुष्य नक्षत्रात आल्यामुळे हा दिवस अधिकच विशेष आहे. प्रतिपदा ते नवमीपर्यंत देवीची विभिन्न स्वरुपात पूजा करावी. नवरात्रीचे पाच दिवस हे खास योगायोगाचे असल्यानं, यावेळी हा सण अति शुभ झालाय. तसंच चैत्र नवरात्रीच्या पुष्य नक्षत्र योगामुळं नवमी दिन विशेष शुभ असेल असे, रायपुरातील ज्योतिषाचार्य चुडामणी तिवारी यांनी सांगितलंय.
८ एप्रिल रोजी, पुष्य नक्षत्र योग आहे. सकाळी १०.३० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ एप्रिलला दुपारी १२.५९ मिनीटांपर्यंत असेल. यावेळी वाहन, दागिने, जमीन इत्यादींची खरेदी विशेषत: फलदायी आहे. याच दिवशी श्रीरामाचा जन्मोत्सवही साजरा केला जाईल. १ एप्रिल रोजी अमृत योग आहे. सकाळी ६.३३ पासून ते रात्री १२.५९ पर्यंतचा योग आहे. नवरात्रीचा पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडवाच्या शुभदिवशी कलशाची स्थापना होईल. याशिवाय १ एप्रिल रोजी अमृत योग, २ एप्रिल रोजी सौभाग्य सौंदर्य योग, ४ एप्रिलला श्रीराम जन्मोत्सव आणि ८ एप्रिल रोजी पुष्प नक्षत्र योग आहे.
पंडित चुडामणी यांनी सांगितलंय की, देवीचा होम लाल फुलं आणि अक्षदा यानं करणे सर्वश्रेष्ठ आहे. देवीला लाल कण्हेरीचं फुल आणि लाल चुनरी अधिक प्रिय आहे. रात्रीच्यावेळी देवीची स्थापना, पूजा आणि होम फलदायी आहे. दुर्गाशक्तीचं वाचन करताना पवित्रता आणि एकाग्रतेवर लक्ष केंद्रित असणं आवश्यक आहे. पूजेसाठी दूर्वांचा उपयोग करु नये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.