का येते स्वप्नांमध्ये सुंदर स्त्री?

अनेकदा स्वप्नांमध्ये सुंदर स्त्री दिसते. याचा नेमका अर्थ समजणं कठीण असतं. मनातील वासना किंवा कामेच्छेचं ते स्वरूप असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र हा समज पूर्णपणे खरा नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 18, 2013, 04:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्वप्नामध्ये आपण जे पाहातो, त्याचा वास्तव जीवनाशी नक्कीच संबंध असतो. आपल्याला आयुष्यात यश मिळेल का, किंवा आपल्या सध्याच्या निर्णयांचे काय परिणाम होणार आहेत, याबद्दलच्या सूचना स्वप्नांमधून आपल्याला मिळत असतात. त्या स्वप्न ज्योतिष्यमध्ये आपण स्वप्नातून भविष्याचा अंदाज घेऊ शकतो.
अनेकदा स्वप्नांमध्ये सुंदर स्त्री दिसते. याचा नेमका अर्थ समजणं कठीण असतं. मनातील वासना किंवा कामेच्छेचं ते स्वरूप असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र हा समज पूर्णपणे खरा नाही. लैंगिक इच्छांशीच या सुंदर स्त्रीचा संबंध असतो असं नाही. तर आगामी चांगल्या गोष्टी घडण्यासंबंधी तिच्यामार्फत आपल्याला सूचना मिळत असतात. एखादं काम अडून राहीलं असेल, तर ते लवकरच पूर्ण होणारआहे याचा संकेत ही सुंदर स्त्री देत असते. तसंच आजारपणात जेव्हा तुम्हाला सतत वाईट स्वप्नं पडून नैराश्य आलं असतं, तेव्हा सुंदर स्त्र स्वप्नात प्रवेश करत मनातील नकारात्मक भाव दूर करत जगण्याची इच्छा वाढवते. आजारातून बरं होण्यासाठी यामुळे मदत होते.
ही स्त्री आपण प्रत्यक्षात पाहिलेली असतेच, असं नाही. ती अचानक उत्पन्न होते. तिचा वावर हा मनाचा खेळ असतो. मात्र तिच्या दिसण्यामुळे आपल्याला नक्की फायदा होतो. अशी स्त्री जर पहाटे स्वप्नात दिसली, तर मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात असं मानलं जातं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.