हातावरून ओळखा कसे आहात तुम्ही...

आपल्या हातात बरचं काही असं नेहमीच म्हंटल जातं. त्याचप्रमाणे आपल्या हातावरून आपलं व्यक्तिमत्व कसं असेल हे देखील समजतं.

Updated: Apr 23, 2013, 09:50 AM IST

www.24taas.com
आपल्या हातात बरचं काही असं नेहमीच म्हंटल जातं. त्याचप्रमाणे आपल्या हातावरून आपलं व्यक्तिमत्व कसं असेल हे देखील समजतं. आपल्या हाताला मुळ रुपात सात भागात विभागले आहे. प्रारंभिक हात, वर्गाकार हात, दार्शनिक हात, कर्मठ हात, कलात्मक हात, आदर्श हात ‍आणि मिश्रित हात हे ते सात भाग.
कलात्मक हात: कलात्मक हात पातळ, कोमल आणि लांब असतात. हाताची बोटे लांब, पातळ आणि सुंदर असतात. नखेसुध्दा लांब, बदामी आणि गुलाबी रंगाची असतात. सर्वांत सुंदर हात याच वर्गात येतो. असा हात दिसण्यात जितका सुंदर तितकाच व्यक्ती जीवनात अयशस्वी होतो. असा हात असणार्‍या व्यक्तींना भाग्य नेहमी साथ देत नाही. असा हात असणारा व्यक्ती सौंदर्यप्रेमी, कलाकार, संगीतकार आणि साहित्यिक असतो. ते विलासी जीवन जगण्याची प्रवृत्ती ठेवतात. तसेच अशा व्यक्ती खूपच भाविक असतात. त्यांचे वैवाहीक जीवन संघर्षमय असते. या प्रकारच्या व्यक्ती दिसण्यात सुंदर, सुशील, नम्र, सभ्य, शांतताप्रिय आणि मृदूभाषी असतात. तसेच या व्यक्ती धार्मिकही असतात.
कर्मठ हात: कर्मठ हात जाड, अस्त-व्यस्त आणि बेडौल आकाराचा असतो. हातातील पुढील भाग पसरलेला असतो. तसेच बोटही जाड व पसरलेले असते. हात कडक असतात. असे हात असणारी व्यक्ती पलायनवादी नसते. कठीण प्रसंगांनाही धैर्याने सामोरे जातो. अशी व्यक्ती आपल्या उद्देशाबाबत निश्चिंत असतात. शारीरिक श्रमाबरोबर मानसिक श्रमाचीही क्षमता ते ठेवतात. या प्रकारातील व्यक्ती रिकाम्या राहत नाहीत. त्या जिज्ञासू असतात. त्यांना व्यावहारिक जीवन जगणे आवडते. त्याचबरोबर त्या भावनाप्रधान आणि स्वतंत्र प्रवृत्तीच्या असतात. कोणातही हस्तक्षेप करीत नाहीत. त्याचबरोबर स्वत:च्या बाबतीतही हस्तक्षेप सहन करीत नाही. या प्रकारातील व्यक्ती संशोधन, अभियांत्रिकी, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि राजकारणाच्या क्षेत्रात यशस्वी होतात. या व्यक्ती ज्या क्षेत्रात जातात तेथे यश संपादन करतात.