या व्यक्ती स्वप्नात येऊन सुचवतात भविष्य

आज भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजात जनतेला दुःख देणाऱ्यांमध्ये राजकारण्यांचा सहभाग मोठा आहे. बडे नेते, मंत्री महोदय किंवा एखादा अधिकारी हा बहुतेकवेळा जनतेचा पैसा खाण्याचं काम करतात. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी वाईट भावना असते.

Updated: Jul 5, 2012, 11:09 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजात जनतेला दुःख देणाऱ्यांमध्ये राजकारण्यांचा सहभाग मोठा आहे. बडे नेते, मंत्री महोदय किंवा एखादा अधिकारी हा बहुतेकवेळा जनतेचा पैसा खाण्याचं काम करतात. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी वाईट भावना असते. पण, ही गोष्ट आजच्याच काळात घडते असं नव्हे, तर प्राचीन काळीही अधिकारी वर्ग हासामान्य जनतेसाठी डोकेदुखीच ठरत होता. याचाच प्रत्यय स्वप्न ज्योतिषातही येतो.

 

स्वप्न ज्योतिषानुसार स्वप्नामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी स्वप्नात दिसतात, त्याचा काही अर्थ निश्चित असतो. बहुतेकवेळा भविष्यात काय घडणार आहे, याची एक झलक आपल्याला स्वप्नात दिसत असते. त्यामुळे स्वप्नांत दिसणाऱ्या गोष्टींना गमतीमध्ये घेऊ नका.

 

स्वप्नामध्ये जर तुम्हाला मंत्री, मोठा अधिकारी किंवा नेता मृत अवस्थेत आढळला, तर समजा की भविष्यात काही शुभ घडणार आहे. मात्र स्वप्नात जर अशा व्यक्ती जेवताना दिसल्या तर आपल्या घरात भांडण होणार आहे असं समजावं. याशिवाय जर मंत्री, नेता किंवा अधिकारी अयोग्य स्थानी दिसला, तर भविष्यात आपल्यावर मोठं संकट येणार आहे, असं समजावं.