www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेबांच्या तब्येतीविषयी प्रत्येकजण चिंतेत होते. मात्र त्यांची तब्येत सुधारते म्हटंल्यावर प्रत्येकाने सुटकेचा श्वास सोडल.
तर त्यामुळे अनेकांनी ट्विटरवर बाळासाहेंबानी लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थाना केली आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत ट्विटरवर प्रतिक्रीया दिली आहे. बाळासाहेबांसाठी प्रार्थना करतानाच त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते नेहमीच लढतील आणि यातून बाहेर पडतील अशी भावनाही व्यक्त केली आहे.
(Anupam Kher)
Praying for Bala Saheb`s speedy recovery. In today`s political scenario this is one Tiger who has never aged. :)
`मी सध्या देवाकडे प्रार्थना करतोय...
बाळासाहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी
त्यांना लवकरात लवकर आराम पडावा
सध्याच्या राजकीय वातावरणात एकच `वाघ` आहे..
आणि हा `वाघ` कधीच म्हातारा होणार नाही!`
असं म्हणत अनुपम खैर यांनी बाळासाहेब हे एकटेच `वाघ` आहेत. आणि या वाघाला संकटातून बाहेर येण्यासाठी वेळ लागणार नाही. असा विश्वास व्यक्त केला आहे.