साहेबांचे शेवटचे काही दिवस आणि शेवटचा एक तास...

आठवडाभरापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागला. ` मातोश्री `च्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीतच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 18, 2012, 07:20 AM IST

www.24taas.com, मुंबई
आठवडाभरापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागला. ` मातोश्री `च्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीतच त्यांच्यावर उपचार सुरू होते. १० नोव्हेंबरला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून त्यांनी सूप घेतल्याची माहिती दिली.
१३ नोव्हेंबरला , मंगळवारी शिवसेनाप्रमुखांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या . ` काँग्रेसला दूर फेका ,अंधार दूर करा ,` असे आवाहन त्यांनी केले . बाळासाहेबांच्या या आवाहनामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची शिवसैनिकांची चिंता दूर झाली .
१४ नोव्हेंबर ला बाळासाहेबांची प्रकृती खालावली . ` मातोश्री ` वरचा कंदील उतरवल्याची बातमी पसरल्यानेशिवसैनिक कमालीचे अस्वस्थ झाले . ` मातोश्री ` वर नेत्यांची रीघ लागली . शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमूलागले . दरम्यानच्या काळात डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते .
१५ नोव्हेंबरला संध्याकाळी बाळासाहेबांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती मिळताच असंख्यशिवसै निकांचा जीव भांड्यात पडला . या दिवशी राज्यपाल के . शंकर नारायणन , मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , भाजप नेते गोपीनाथ मुंडे , नाना पाटेकर , शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी `मातोश्री ` ला भेट देऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली . रात्री अकराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी `मातोश्री ` बाहेर येऊन , बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगताच शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला . `बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत . मी आशा सोडलेली नाही , तुम्हीही सोडू नका . एका लढणाऱ्या नेत्याचे आपणलढणारे सैनिक आहोत . माझा प्रार्थनांवर विश्वास आहे . या प्रार्थनेची शक्तीच आपल्या देवाला संकटातून बाहेरकाढल्याशिवाय राहणार नाही ,` अशा शब्दांत त्यांनी शिवसैनिकांना उभारी दिली . त्यानंतर देशभरातशिवसेनाप्रमुखांसाठी प्रार्थना , यज्ञ , पूजा - अर्चा सुरू झाल्या . याच दिवशी राजकारणी , कलाकार , आणिउद्योगपतींची रीघ मातोश्रीवर लागली .
१६ नोव्हेंबरचा दिवस निश्चिंत गेला .
१७ नोव्हेंबर , शनिवारी मुख्यमंत्री चव्हाण , शरद पवार , उद्धव ठाकरे , राज ठाकरे , राज्याचे पोलिसमहासंचालक , पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्यात बोलणी सुरू होती . याच दिवशी शिवसेनेच्या सर्वनगरसेवकांना ` मातोश्री ` वर बोलावण्यात आले . दुपारी ` मातोश्री ` वर लगबग सुरू झाली . ठाकरे कुटुंबातील सर्वसदस्य ` मातोश्री ` वर जमू लागले . शिवसेनेची नेतेमंडळीही आली . पोलिसांचीही धावपळ सुरू झाली . तेव्हा मात्रशिवसैनिकांच्या काळजाचा ठोका चुकला . सायंकाळी पाच वाजता बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त आले आणिशिवसैनिकांचा बांध फुटला .
आणि शेवटचा एक तास
बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत दुपारी साडे तीन वाजता मालवल्याचं बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी जाहीर केलं. पण ही घोषणा होण्याअगोदर बाळासाहेबांची प्रकृती जास्त बिघडल्यानं मातोश्रीवर बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. हा तणाव उद्धव ठाकरे यांना सहन झाला नाही आणि ते चक्कर येऊन पडले.
दुपारी अडीच वाजल्यापासून मातोश्रीवर काय काय घडलं, याचा हा वृत्तांत...
दुपारी २.३० वाजता - बाळासाहेबांचा पल्स रेट आणि ब्लड प्रेशर खूपच कमी झालं.
दुपारी २.३५ - व्हेंन्टिलेटर आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमवर असलेल्या बाळासाहेबांचे ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
दुपारी २.४५ - बाळासाहेबांची प्रकृतीविषयी ठाकरे कुटुंबीयांना कल्पना दिली गेली.
दुपारी २.५५ - राज ठाकरे यांना बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल कळवण्यात आलं.
दुपारी ३.१५ - राज ठाकरे पत्नी शर्मिलासह मातोश्रीवर दाखल झाले.
दुपारी ३.२० - बाळासाहेबांना ह्रदयविकाराचा झटका आला. उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट समजताच त्यांना जबरदस्त धक्का बसला आणि ते चक्कर येऊन पडले.
दुपारी ३.३० ते ३.३३ - बाळासाहेबांना लावण्यात आलेलं लाईफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात आली. डॉक्टरांना बाळासाहेबांना वाचवण्यात अपयशी आलं.
दुपारी ३.४० ठाकरे कुटूंबातील महिलांना मोठा धक्का बसला. महिलांना अश्रू अनावर झाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र यांनी सर्व शिवसेना नेत्यांना फोन केल