www.24taas.com, झी मीडिया, जालना
जालन्याच्या युवतीची आयटी क्षेत्रात उतुंग झेप घेतली. तिला चक्क दहा नोकरीच्या ऑफस आल्यात. मात्र, तिने गुगलची ऑफर स्वीकारली. आता तिला वर्षाकाठी गुगल चक्क एक कोटी रूपयांचे वार्षिक वेतन देणार आहे.
कुशाग्र बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेच्या साधनेतून जालन्याच्या श्वेता करवा या तरुणीने उतुंग अशी झेप घेतलीय. आयटी क्षेत्रातील गुगलसारख्या नामांकित कंपनीने तिला चक्क एक कोटी रुपये वार्षिक वेतनाची नोकरी दिलीय.
वयाच्या अवघ्या २२व्या वर्षीच एक कोटी रुपयांच्या वार्षिक वेतनाची नोकरी मिळवून जालन्याच्या श्वेता हिने एक नवा विक्रम केला आहे. दिल्ली आयआयटीतून गणित आणि संगणक या विषयात एमटेक केल्यानंतर अमेरिकन कंपनी गुगलने श्वेताचा कॅम्पस इंटरव्हूच्या माध्यमातून निवड झाली केली. या निवडीतून श्वेताचं स्वप्न तर साकार झालंच पण वर्षाकाठी तिला गुगलकडून कामाचा मोबदला तब्बल एक कोटी रुपये मिळणार आहे.
आयटी क्षेत्रात निवड झालेली श्वेता ही जालन्याची पहिलीच तरुणी आहे. श्वेताचे आई आणि वडील दोघेही डॉक्टर आहेत. श्वेताला पहिल्यापासूनच शिक्षणात रुची होती मात्र आई वडिलांप्रमाणेच डॉक्टर व्हावं, अस तिला कधीही वाटल नाही. गणित या विषयाची अत्यंत गोडी असल्यानं तिच्या अभ्यासात कमालीची एकाग्रता कायमच दिसून आली २००७ मध्ये
श्वेताने दहावीतून ८२.४ टक्के गुण मिळवून विज्ञानशाखेत प्रवेश घेतला. बारावीत ८३टक्के गुण मिळाल्याने तिने आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी पूर्ण केली. त्यात ती यशस्वी झाली.
चार महिने सलग अठरा तास अभ्यास तिने केला आणि वयाच्या अवघ्या २२व्या वर्षीच श्वेता चक्क करोडपती झाली. आयआयटीच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये श्वेताला प्रतिष्ठित दहा बड्या कॅम्पन्यांच्या ऑफर होत्या. पण श्वेताचं मुख्य लक्ष गुगल युएसचं मुख्यालय होत म्हणूनच तिने गुगलची ऑफर येताच तिने लगेच होकार दिला.
गणित म्हटलं की, विद्यार्थ्यांना टेन्शन येते. मात्र या विषयाला जास्त वेळ देऊन अभ्सास केला की त्यात घवघवीत यशाबरोबरच आयुष्यालाही नवी कलाटणी मिळते, हेच श्वेताच्या यशातून दिसून येतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ