www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
हायटेक सुविधा आणि विविध अॅप्लिकेशन फक्त टाईमपाससाठी नाही तर कामाच्या ठिकाणीही या सुविधांचा चांगला वापर करता येऊ शकतो, हे नांदेड पोलिसांनी सिद्ध केलंय. तरुणांमध्ये एकमेकांना ‘डिस्टर्ब’ किंवा ‘हाय-हॅलो’ करण्यासाठी लोकप्रिय ठरलेलं ‘व्हॉटस अप’ आता सध्या शहरातील पोलिसांच्याही मोबाईलवर दिसत आहे... आणि हा टाईमपास नक्कीच नाही तर या सुविधेतून पोलिसांना घटनास्थळावरील परिस्थितीचा अंदाजही येऊ शकेल आणि कामात टंगळमंगळ कर्मचाऱ्यांना लगामही घालता येणार आहे.
कामावर किंवा घटनास्थळी नसतानाही आपण तिथंच असल्याच्या बाता मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर या हायटेक सुविधेमुळे लक्ष ठेवता येणार आहे. आपण ज्या ठिकाणी कार्यरत असू, त्या ठिकाणचा फोटो `वॉट्स अॅप`वर अपलोड करण्याचा प्रयोग नांदेड ग्रामीण, इतवारा पोलिसांनी अंमलात आणलाय. इतवारा विभागात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झालीय.
सकाळी दहा ते रात्री नऊ वाजता दररोज या वेळी हजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याचे फोटो मोबाइलद्वारे फोटो काढून ते `वॉट्स-अप` या अॅप्लिकेशनद्वारे ते वरिष्ठ अधिकारी यांचे मोबाइलवर अपलोड केले जात आहेत. या उपक्रमामुळे हजर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने, अशा प्रयोगांचं स्वागतच होतंय. पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनीही हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर राबविण्यास हिरवा कंदील दाखविलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.