www.24taas.com, औरंगाबाद
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. या घोटाळ्यातील 53 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करा असे निर्देशही जळगाव कोर्टाला देण्यात आलेत.
त्यामुळं घोटाळ्यातील आरोपींविरोधातला फास आणखीनच आवळला गेलाय. 1996 मध्ये तत्कालिन जळगाव नगरपालिकेत 26 कोटींचा घरकुल घोटाळा झाला होता. या प्रकरणात सुरेश जैन यांच्यासह राज्यमंत्री गुलाबराव देवकर, आणि स्थानिक नेते प्रदीप रायसोनी खान्देश बिल्डरचे राजा मयूर आणि नाना वाणी यांच्यासह 53 आरोपी आहेत.
जळगाव पालिकेच्या 29 कोटी 59 लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वी दोनवेळा फेटाळला गेला होता. बहुचर्चित घरकूल गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन नगराध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यासह बिल्डर आणि अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल झालेत.