www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मराठी तरुणांना देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. तर तुमच्यासाठी संधी आहे. यंदाचा सैन्य भरती मेळावा 2013 नांदेडमध्ये भरणार आहे. 19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान ही सैन्य भरती होणार आहे. ही सैन्य भरती औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार आणि परभणी या जिल्ह्यातील रहिवासी तरुण युवक या संधीचा फायदा घेऊ शकतात.
उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन लष्कराने केले आहे. सकाळी 4 ते सकाळी 7 पर्यंतच प्रवेश दिला जाईल.
सैन्यातील विविध पदासाठी तारीख निहाय 9 जिल्ह्यातील उमेदवारांची भरती होईल.
भरतीची तारीख, जिल्हा व भरती पदे पुढील प्रमाणे आहे.
19 नोव्हेंबर, परभणी जिल्हा : सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
20 नोव्हेंबर, हिंगोली व नंदुरबार जिल्हा : सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
21 नोव्हेंबर, नांदेड जिल्हा : सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
22 नोव्हेंबर, जळगांव जिल्हा : सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
23 नोव्हेंबर रोजी मेडीकल फिटनेस टेस्ट व ट्रेडमनची ट्रेड चाचणी होईल.
24 नोव्हेंबर, बुलढाणा जिल्हा: सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
25 नोव्हेंबर, धुळे जिल्हा : सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
26 नोव्हेंबर, जालना जिल्हा : सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक / स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
27 नोव्हेंबर औरंगाबाद जिल्हा : सोल्जर जी.डी., सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सिंग सहाय्यक, सोल्जर लिपीक, स्टोअर किपर, सोल्जर ट्रेड्समन.
28 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील ज्या उमेदवारांना झेडआरओ पुणे यांनी मान्यता दिली आहे, अशा सर्व उमेदवारांसाठी व सर्व प्रकारचे ट्रेडस, ट्रेड्समेन एओएस, एसओइएक्स, एसओडब्ल्यूडब्ल्यू, एनसीसी प्रमाणपत्रधारक, राष्ट्रीय व राज्यपातळी खेळाडू यांची भरती होईल.
शैक्षणिक व शारिरीक पात्रता:
सोल्जर जी. डी. या पदासाठी 10 वी इयत्ता उत्तीर्ण 45 टक्के गुण असावे किंवा 12 उत्तीर्ण असल्यास टक्केवारीची गरज नाही. वय 17 वर्ष 5 महिने ते 21 वर्ष, उंची 168 से.मी., वजन 50 किलो, छाती 77 ते 82 सें.मी.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.