डॉ. सुदाम मुंडेवर आरोपपत्र दाखल

परळीच्या डॉ. सुदाम मुंडेवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. महिलेचा गर्भपात करताना तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप डॉक्टर मुंडेवर करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 12, 2012, 02:29 PM IST

www.24taas.com, बीड
परळीच्या डॉ. सुदाम मुंडेवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. महिलेचा गर्भपात करताना तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप डॉक्टर मुंडेवर करण्यात आलाय.
विजयमाला पट्टेकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. डॉ. सुदाम मुंडे बरोबरच त्याची पत्नी डॉ. सरस्वती मुंडे, डॉ. राहुल कोल्हे यांच्यासह एकूण 17जणांवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आलय.
स्त्रीभ्रूणहत्येच्या या प्रकरणाने सबंध राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर डॉ. सुदाम मुंडे व त्याची पत्नी डॉ. सरस्वती यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रसार माध्यमे, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरल्याने या गुन्ह्यातील कलमांत वाढ करण्यात आली.
फरारी डॉ. मुंडे पती-पत्नी 26 दिवसांनंतर परळी शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले होते. आणि आता या आरोपींवर सदोष मनुष्यवधासह फौजदारी न्यायसंहितेच्या सीआरपीसी 273 कलमांन्वये अंतिम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.