<B>`सृष्टी राणा`चा हिरेजडीत मुकूट जप्त! </b>

दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३’च्या मुकूटानं सन्मानित करण्यात आलेली भारताची सृष्टी राणा हिचा हिरेजडीत मुकूट सीमा शुल्क न चुकवल्यानं जप्त करण्यात आलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 6, 2013, 01:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३’च्या मुकूटानं सन्मानित करण्यात आलेली भारताची सृष्टी राणा हिचा हिरेजडीत मुकूट सीमा शुल्क न चुकवल्यानं जप्त करण्यात आलेत.
एका वरिष्ठ सीमा शुल्क अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय सृष्टी राणा छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली तेव्हा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तिला थांबविलं. तिच्या मुकूटात हिरे जोडले गेले असल्यानं तिला यासाठी सीमा शुल्क भरण्यास सांगितलं गेलं. परंतु, हा मुकूट नेमका कधी जप्त करण्यात आला हे समजलेलं नाही.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या स्पर्धकाला अशा स्वरुपाचा पुरस्कार प्राप्त झाला, तर त्याला सीमा शुल्कात सूट मिळण्यासाठी सीमा शुल्क विभागाकडून केंद्रीय तसंच उत्पादन एवं सीमा शुल्क बोर्डाकडून एका विशेष अधिसूचना प्राप्त व्हावी लागते. मात्र, सृष्टी राणा हिच्या बाबतीतल अशी कोणतीच अधिसूचना न मिळाल्यानं तिचा मुकूट जप्त करण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.