प्रसिद्ध लॅण्डस्केप आर्टिस्ट यशवंत शिरवाडकर यांचे 'बनारस' हे चित्रप्रदर्शन नेहरू सेन्टर आर्ट गॅलरीत भरलं आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत चालणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
शिरवाडकर गेल्या पस्तीस वर्षांपासून लॅण्डस्केप प्रकारातील चित्र काढत असून त्यांचे हे ८२वे प्रदर्शन आहे. १९७७ पासून ते वर्षाला किमान एक प्रदर्शन भरवतात. शिरवाडकर यांनी साधारणत: पंधरा वेळा वाराणसीचा दौरा केलेला आहे. तिथली स्थळं आणि वास्तु त्यांच्या चित्रांमध्ये दिसतात.
शिरवाडकर यांनी यापूर्वी राजस्थानातल्या वास्तुंना आपल्या कॅनव्हासवर जागा दिली होती. वाराणसी त्यांचा आवडता विषय आहे. 'बनारस'मध्ये घाटावरील इमारती, त्यांचे पाण्यात उमटलेलं प्रतिबिंब असंख्य बारकावे बघायला मिळतात.