छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचं निधन

जेष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचं आज पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईत निधन झालं. मुंबईत गिरगावमधल्या राहत्या घरी आज सकाळी त्यांचं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते.

Updated: Sep 26, 2011, 03:54 PM IST

  मुंबई, 13 सप्टें. 2011 -  जेष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष  यांचं आज पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईत निधन झालं. मुंबईत गिरगावमधल्या राहत्या घरी आज सकाळी त्यांचं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. हिंदी सिनेमाजगतातल्या अनेक मान्यवरांचे फोटो त्यांनी काढले होते. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी आपले दुःख व्यक्त केले आहे. प्रसिध्द लेखिका शोभा डे यांचे ते चुलत बंधू होते. सिनेजगतातल्या  अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्यापासून ते ऐश्वर्या रायपर्यंत अनेक सेलिब्रिटींचे फोटो त्यांनी काढले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, सुनिल गावस्कर यांचेही त्यांनी काढलेले  फोटो खूप गाजले. राजाध्याक्ष यांनान संगीताची खूप आवड होती आणि उत्तम जाण ही होती. ऑपोरा संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत याचा त्यांच्याकडे खूप मोठा संग्रह होता.

गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेबर १९५० मध्ये मुंबईत झाला. मुंबईतल्या सेंट झोवियर्स कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. १९८७ साली जाहिरात एजन्सीतून त्यांनी राजीनामा देऊन व्यावसाटिक फोटोग्राफी सुरू केली. काही काळातच त्यांना ग्लॅमरस फोटोग्राफर म्हणून मान्यता  मिळाली. अभिनेता सलमान खान,  अभिनेत्री टीना मुनिम यांसारखे कलाकार चित्रपटसृष्टीला मिळवून देण्याची किमया गौतम राजाध्यक्ष यांनी केली होती.

 

 

Tags: