www.24taas.com, नवी दिल्ली,
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८.०० वाजता फाशी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याची अधिकृत माहिती, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिली. दरम्यान, जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आलीय. १३ डिसेंबर २००१मध्ये संसदेवर हल्ला करण्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू होता. अफजलला फाशी देण्यात आल्याने देशभरात आनंद साजरा होत आहे. त्याचा फाशीपर्यंतचा प्रवास.
हल्ल्याचा घटनाक्रम
- १३ डिसेंबर २००१ संसदेवर अतिरेक्यांतचा हल्ला.
- १८ डिसेंबर २००२ महंमद अफजल गुरू, एस. आर. गिलानी, अफसान गुरू आणि शौकत गुरू यांना विशेष पोटा न्यायालयाकडून फाशीची शिक्षा.
- २९ ऑक्टोबर २००३ महंमद अफजल गुरू आणि शौकत गुरूची फाशी कायम; पण गिलानी आणि अफसान गुरू यांची उच्च न्यायालयाकडून मुक्तता.
- ५ सप्टेंबर २००५ महंमद अफजल गुरूची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम, शौकतला दहा वर्षांची सक्तमजुरी.
- २६ सप्टेंबर २००६ - अफजलला २० ऑक्टोनबर २००६ रोजी फाशी देण्याचा न्यायालयाचा आदेश; अफजल गुरूकडून दयेचा अर्ज दाखल.
- ६ मे २०१० - अफजल गुरू याच्या दयेच्या अर्जासंबंधीची फाइल दिल्ली सरकारने चार वर्षांनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविली. अफजल गुरूला फाशी द्या; पण या शिक्षेमुळे कायदा सुव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घ्यायला हवा, अशी शिफारस शीला दीक्षित सरकारने केली.
- २४ जून २०१० अफजल गुरूचा दयायाचनेचा अर्ज फेटाळावा, अशी शिफारस केंद्र सरकारने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना केली.
- २३ जानेवारी २०१३ - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजलचा दया अर्ज फेटाळला
- ३ फेब्रुवारी २०१३ राष्ट्रपती कार्यालयाकडून अफजलच्या फाशीबाबत सर्व कागदपत्रे केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपविण्यात आली
- ९ फेब्रुवारी २०१३- अफजलला तिहार कारागृहात सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली.