हे लक्षात ठेवा... आपलं आरोग्य आपल्या हातात..

Updated: Aug 3, 2011, 04:11 AM IST

हे लक्षात ठेवा

द्य ब्रेकफास्ट, मिड मॉनिर्ंग स्नॅक्स, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण या पाच टप्प्यात तुमचं खाणंपिणं असू दे.

द्य जे फूड तुम्ही ऑफिसला नेणार आहात त्यात भरपूर पोषणमूल्यं असतील, याची खात्री करून घ्या.

द्य एका वेळी भरपूर खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या प्रमाणात खाणं अधिक योग्य!

द्य खाण्याकडे लक्ष देतानाच दिवसभरात भरपूर पाणी प्या.

द्य पाण्याबरोबरच संत्र, मोसंब यांसारखी रसदार फळं जेवणासोबत खाऊ शकता.

द्य तुमच्या जेवणात डाळ-भात, मांसाहार-चपाती/भात, भात/चपाती-पालेभाजी, भात/चपाती-कंदभाज्या, भात/चपाती-इतर भाज्या किंवा भात/चपाती-दूध अशा विभागांतील कॉम्बिनेशन असलंच पाहिजे. यामुळे तुम्हाला पुरेशी पोषणमूल्य आहारातून मिळतील.

द्य तुमचा आहार कलरफुल आणि चवदार असू दे. यामुळे रोज तेच तेच अन्न खाऊन कंटाळा येणार नाही.

द्य तुम्हाला भाज्या आवडत नाहीत पण, बर्गर आवडत असेल तर वेगवेगळ्या भाज्या उकडून त्या मॅश करा. यापासून कटलेट बनवून तुमच्या आवडीचा छान बर्गर बनवता येईल. चपाती रोल किंवा पराठाही बनवता येईल.

द्य पावभाजी बनवताना भोपळा, गाजर यांचाही त्यात समावेश करता येईल. यातून व्हिटॅमिन ए तुम्हाला मिळेल.

द्य समोसा बनवताना त्यात फक्त बटाट्याची भाजी घालण्यापेक्षा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करता येईल.

द्य पालेभाज्यांपासून पराठे, खिचडी/पुलाव बनवता येईल. रोजच्या आहारात हिरवी चटणी असू दे.

द्य दूध आवडत नसेल, तर पनीर पराठा, पनीर कटलेट, ग्रिल्ड सँडविचेसचा पर्याय आहे.

द्य कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी ताक, लिंबूसरबत घ्या.

द्य दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंड, मांसाहार (चिकन/मटण) यापैकी काही अन्नपदार्थ रोज आहारात असू दे. यामुळे पुरेसे प्रोटिन्स तुमच्या शरीरात जातील.

द्य जेवताना चहा/कॉफी घेऊ नका.

द्य सकाळच्या वेळेत ३-४ खजूर किंवा मूठभर सुका मेवा खाता येईल.

द्य सकाळच्या वेळेत बिस्किटं, टोस्ट याऐवजी गूळ चपाती, खाकरा खाऊ शकता.

द्य व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी रोज एक केळं किंवा त्या त्या ऋतूमध्ये मिळणारं फळ खा.

द्य बिस्किटांऐवजी चिक्की, कुरमुरे/पोह्यांचा चिवडा (यात शेंगदाणे, चणे, खोबरं टाकू शकता) अशा पदार्थांना पसंती द्या.

द्य सलाड, भेळमध्ये मोड आलेली कडधान्यं मिक्स करा.

द्य चपाती, भाकरी खायला बऱ्याचदा अनेकांना कंटाळा येतो. अशा वेळी पालक, मेथी, मुळा, तांबडा भोपळा, गाजर, पनीर, बटाटा, बीट, कंद टाकून कलरफुल आणि भरपूर पोषणमूल्य असणाऱ्या चपाती/ पराठे बनवू शकता.

टाइमटेबल

खाण्याचे एवढे पर्याय मिळाल्यावर आता खाण्याचं टाइमटेबल फॉलो करणं अधिक गरजेचं आहे.

ब्रेकफास्ट

सकाळी घरातून निघण्यापूवीर् पुढे दिलेला ब्रेकफास्ट करायला विसरू नका.

बदाम/अक्रोड/खजूर/अंजीर/खारीक/मनुका,

हर्बल टी/दूध, ओट्स/मुसली/कॉर्नफ्लेक्स/राइसफ्लेक्स/व्हीटफ्लेक्स/चपाती/पराठा/भाकरी/ठेपला/उपमा/अंड/फुलका/ढोकळा/डोसा/व्हेज किंवा नॉनव्हेज कटलेट/थालीपीठ,

फळ

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर दुपारच्या जेवणाआधी थोडा नाश्ता घेऊ शकता. हेच पर्याय संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही उपयुक्त ठरू शकतात.

मोड आलेली कडधान्य/ उसळ/

उकडलेल्या डाळी/ खाकरा/

डोसा/मेदूवडा/बेसन टोमॅटो ऑम्लेट/पोहे/उपमा/थालीपीठ/पनीर चीज सँडविच/रवा, बेसन किंवा राजगीरा लाडू/चिवडा,

लस्सी/ताक/लिंबू सरबत

दुपारचं आणि रात्रीचं जेवण

व्हेज/नॉन व्हेज सूप, भाजी-चपाती/भाकरी/रोटला/फुलका/थालीपीठ/डाळभात/खिचडी/पुलाव/बिर्यानी/मोड आलेली कडधान्यं,

ताक/दही/लस्सी,