स्मरणशक्ती : योग्य आहाराची गरज

लहान मुलांसाठी दही आणि दुधाचे पदार्थ चांगले असतात. दही आणि दुध नियमित सेवन केले पाहिजे. कारण दही-दूध पोषक द्रव्ये आणि ‘ब’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहेत. तसेच ते मेंदूचे टिश्यूज, एंझाइम्स आणि न्यूरोट्रान्समीटरच्या विकासासाठी खूप गरजेचे आहे.सुका मेवा आणि सर्व प्रकारच्या बेरीजचे सेवन करावे. यामुळेसुद्धा मेंदूला खूप फायदा होतो.

Updated: Mar 19, 2012, 03:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

तुम्ही विसराळू आहात का? जर असाल तर तुमच्या मुलांची तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण तुम्ही मुलांची योग्य काळजी घेतली नाहीतर तीही विसरभोळी होतील. त्यांची स्मरणशक्ती  वाढविण्यासाठी  त्यांना योग्य आहार दिला पाहिजे. तुम्ही म्हणाल, कोणता आहार द्यायचा. काही काळजी करू नका.

लहान मुलांसाठी दही आणि दुधाचे पदार्थ चांगले असतात. दही आणि दुध नियमित सेवन केले पाहिजे. कारण दही-दूध पोषक द्रव्ये आणि ‘ब’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहेत. तसेच ते मेंदूचे टिश्यूज, एंझाइम्स आणि न्यूरोट्रान्समीटरच्या विकासासाठी खूप गरजेचे आहे.सुका मेवा आणि सर्व प्रकारच्या बेरीजचे सेवन करावे. यामुळेसुद्धा मेंदूला खूप फायदा होतो.

लहान मुलांनी ओट्स किंवा ओटमीलचे सेवन अवश्य करावे. कारण हे ‘ब, ई’ जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि झिंकचे उत्तम स्रोत आहेत. तसेच हे न्यूट्रिशन्स मेंदूच्या उत्तम कार्यप्रणालीसाठी खूप आवश्यक आहेत.  अंड्यांचेही सेवन करावे. कारण अंडी पोषक द्रव्यांचे चांगले स्रोत आहेत. अंड्यातील पिवळ्या भागात असलेला कोलाइन मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकतो. तर मासे ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचा चांगला स्रोत आहेत. माशांच्या सेवनाने स्मरणशक्तीही वाढते. त्यामुळे मुलांना मासे देणे तितकेच आवश्यक आहे.

लहान मुलांची एकाग्रता वाढवणे, मेंदूची कार्यप्रणाली चांगली ठेवणे आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वरीप्रमाणे योग्य आहार देणे गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मते मानवी मेंदूचा भार शरीराच्या एकूण वजनाच्या केवळ दोन टक्के असतो; परंतु त्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी भरपूर न्यूट्रिशन्सची आवश्यकता असते.