टॉमाटोची लाली करी हदयाची रखवाली

दररोज टॉमाटो खाणं हृदयासाठी चांगलं असल्याचं एका अभ्यासातून निष्पन्न झाल आहे. टॉमाटो रोज खाण्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्त दाबावर नियंत्रणास ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळेच हृदयरोगा सारखे आजार होत नाहीत असा निष्कर्ष अभ्यासाअंती काढण्यात आलं आहे.

Updated: Dec 6, 2011, 05:40 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दररोज टॉमाटो खाणं हृदयासाठी चांगलं असल्याचं एका अभ्यासातून निष्पन्न झाल आहे. टॉमाटो रोज खाण्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्त दाबावर नियंत्रणास ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळेच हृदयरोगा सारखे आजार होत नाहीत असा निष्कर्ष अभ्यासाअंती काढण्यात आलं आहे. ऍडलिड विद्यापीठाच्या टीमने असा दावा केला आहे की टॉमाटोत असलेले आयकोपेन नावाच्या पिंगमेंटमध्ये चांगल्या आरोग्यासाठी पोषक घटन द्रव्यं असतात.

 

गेल्या ५५ वर्षात १४ अभ्यासातून गोळा केलेल्या निकालांच्या आधारे कोलेस्ट्रटल आणि रक्तदाब यांच्यावर आयकोपेनचा काय परिणाम होतो याद्वारे हे निष्कर्ष काढण्यात आले. संशोधनानुसार आयोकपेनचे जादा सेवन केल्याने रक्तवाहिन्या मजबुत होतात आणि त्यामुळे पक्षघात आणि हृदयविकाराच्या आजारांचा धोका कमी होतो.  ताज्या टॉमाटोच्या तुलनेत प्रक्रिया केलेल्या टॉमाटोत आयकोपेन अधिक चांगल्या प्रकारे मिसळले जाते.  दररोज जर अर्धा लिटर टॉमाटोचा रस सेवन केला किंवा ५० ग्रॅम टॉमोटोची पेस्ट खाल्ली तर हृदयविकाराच्या आजारपासून संरक्षण प्राप्त होते असं संशोधनाअंती सिध्द झालं आहे.