www.24taas.com, लंडन
मधुमेहापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दिवसातून कमीत कमी चार वेळा चहा प्या... असा सल्ला दिलाय ब्रिटेनच्या वैज्ञानिकांनी...
मधुमेह आणि चहा या विषयावर अभ्यास करताना वैज्ञानिकांनी युरोपमधल्या चहा पिण्याची सवय असलेल्या १२ हजारांपेक्षा जास्त लोकांकडून माहिती जमा केली. यावर रोज चार कप चहा पिणाऱ्या लोकांना इतर लोकांपेक्षा मधुमेह होण्याचा धोका २० टक्क्यांनी कमी होता, असं त्यांच्या निदर्शनास आलं.
दररोज, १ ते ३ कप चहा पिणाऱ्या लोकांना हा धोका जास्त होता तर जास्त चहा पिणाऱ्या लोकांना हा धोका कमी असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला. पण, याचवेळी दूध आणि चहा पावडर असलेला चहा पिणं स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे, असंही या वैज्ञानिकांनी यावेळी नमूद केलंय.
.