कापूस शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं

सरकारने कापूस उत्पादकांना सरकारची मदत जाहीर. धान आणि सोयाबीनला प्रति हेक्टरी दोन हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चार हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली आहे. २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.

Updated: Dec 24, 2011, 08:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

सरकारने कापूस उत्पादकांना सरकारची मदत जाहीर केली आहे. धान आणि सोयाबीनला प्रति हेक्टरी दोन हजारांची मदत जाहीर  करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चार हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली आहे.

 

२५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. प्रति एकर मदत देण्याची मागणी  सरकारने अमान्य केली आहे.

 

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी भाजपाचे आमदार गिरीश महाजन आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी उपोषण केलं होते.  शिवसेनेने देखील कापूस दिंडी काढून रान उठवले होतं. पण सरकारने अखेर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.