सेहवाग, झहीर करणार टीममध्ये कमबॅक

श्रीलंकेच्या दौ-यासाठी भारतीय टीममध्ये कोण कोणत्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणार याबाबत सा-यांना उत्सुकता लागली आहे. एशिया कपनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौ-यावर जाणार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान टीममध्ये कमबॅक करतील तर सचिन तेंडुलकरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

Updated: Jul 3, 2012, 01:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

श्रीलंकेच्या दौ-यासाठी भारतीय टीममध्ये कोण कोणत्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणार याबाबत सा-यांना उत्सुकता लागली आहे. एशिया कपनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौ-यावर जाणार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान टीममध्ये कमबॅक करतील तर सचिन तेंडुलकरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

 

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची टीम पुन्हा एकदा क्रिकेट फिल्डवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. एशिया कपनंतर टीम इंडियाला श्रीलंकेच्या खडतर आव्हानाला सामोर जाव लागणार आहे. 21 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान ही वन-डे आणि टी-20 सीरिज रंगणार आहे. यामध्ये भारतीय टीमला 5 वन-डे आणि एक टी-20 मॅच खेळावी लागणार आहे. एशिया कपमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर धोनी अँड कंपनीला आपली कामगिरी सुधारण्यावर भर द्यावी लागणार आहे.

 

श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये एशिया कपमध्ये दुखापतीमुळे खेळू न शकणारे वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान टीममध्ये कमबॅक करू शकतात. तर सचिन तेंडुलकरच्या खेळण्यावर अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे सचिन जर खेळणार नसेल तर युवा अजिंक्य रहाणेला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरबरोबर अजिंक्य रहाणेला तिसरा ओपनर म्हणून टीममध्ये स्थान देण्यात येईल.

 

रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हे चारही जण टीममध्ये कायम असणार आहेत. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये फारसा बदल पाहायला मिळणार नाही. तर स्पिनर्समध्ये रवींद्र जाडेजाला वगळण्यात येऊ शकते. त्याच्याऐवजी राहुल शर्माची टीममध्ये वर्णी लागू शकते. टीम इंडियाचा सध्याचा आघाडीचा स्पिनर म्हणून आर. अश्विनकडे पाहिलं जातं त्यामुळे त्याचही टीममधील स्थान निश्चित समजण्यात येतंय. लंका दौ-यासाठी तिसरा स्पिनर कोण असेल याकडेच सा-यांच लक्ष असेल.

 

भारतीय टीम चार फास्ट बॉलर्स घेऊनही लंकेमध्ये खेळू शकते. त्यामुळे झहीर खानच्या साथीला, उमेश यादव, प्रविण कुमार आणि विनय कुमारची निवड होण्याची शक्यता आहे. झहीर खानच्या कमबॅकमुळे भारतीय बॉलिंगला आणखी मजबूती मिळणार आहे. इरफान पठाणला ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये स्थान देण्यात येऊ शकते. आता, सिलेक्शन कमिटी एखाद्या नव्या चेह-या टीममध्ये स्थान देते का याकडेही क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.