www.24taas.com, मुंबई
भारतीय टीममधील सीनियर प्लेअर्सला टप्पा टप्प्यानं नारळ दिला जाऊ शकतो असे संकेत भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं दिलेय..पर्थ टेस्टमध्ये भारताने इनिंगने पराभव झाल्यानंतर, टीम इंडियावर अनेक माजी क्रिकेटर्सनी सडकून टीका केली... ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या तिन्ही टेस्टमध्ये झालेल्या पराभवाचं प्रमुख कारण भारताची फ्लॉप बॅटिंग असल्याचं धोनीनं मान्य करताना...खराब परफॉर्मन्स करणा-या सिनिअर प्लेअर्सविरूद्ध भविष्यात काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल असा संकेतही धोनीने दिला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताला लागोपाठ तीन कसोट्यांमध्ये अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे. पर्थच्या कसोटीत भारत एक डाव आणि ३७ रन्सी पराभूत झाला. पर्थची कसोटी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी खिशात टाकली. हे कमी की काय स्लो ओव्हर टाकल्यामुळे धोनीला एक कसोटीसाठी बंदीही घालण्यात आली आहे. भारताची परदेशातली गेल्या वर्षाभरातली कामगिरी अतिशय खराब राहिली आहे आणि त्यामुळे आता बोर्ड कठोर कारवाईचे पाऊल उचलेल अशी चिन्हं आहेत.