सचिनला विश्रांती, टीम इंडियाची घोषणा

भारत आणि श्रीलंका दरम्यान होणा-या आगामी वनडे क्रिकेट मालिकेसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांनी संघात पुनरागम केले आहे.

Updated: Jul 4, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

भारत आणि श्रीलंका दरम्यान होणा-या वनडे क्रिकेट मालिकेसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांनी संघात पुनरागम  केले आहे.

 

टीम इंडिया  २१ जुलै रोजी श्रीलंका दौ-यातील पहिला सामना खेळेल. २७ जुलैपासून सुरू होत असलेल्या लंडन ऑलिम्पिकदरम्यान श्रीलंकेत ही वनडे मालिका सुरू असेल. बांगलादेशात झालेल्या आशिया चषकासाठी संघातून बाहेर असलेले झहीर आणि सेहवाग यांची श्रीलंका दौ-यासाठी संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय उमेश यादवसुद्धा फिटनेसमुळे आशिया चषकात खेळू शकला नव्हता. श्रीलंकेविरुद्ध २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी हे तिन्ही खेळाडू खेळणार आहेत.

 

 इंडियाचा संघ - 

वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली (उपकप्तान), गौतम गंभीर, आर. आश्विन, उमेश यादव, अशोक डिंडा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, विनय कुमार, रोहित शर्मा, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी, राहुल शर्मा

 

कधी आहेत सामने - :

(सर्व सामने दिवस-रात्र) :

पहिला वनडे २१ जुलै,

दुसरा वनडे २४ जुलै,

तिसरा वनडे २८ जुलै,

चौथा वनडे ३१जुलै,

पाचवा वनडे ४ ऑगस्ट.

टी-२० सामना ७ ऑगस्ट.