धोनी एँड कंपनीची सध्याची खराब कामगिरी पाहता टीम आणि टीमचा कॅप्टन धोनी यांच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. मात्र सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी धोनीला त्याचप्रमाणे कोणा एका क्रिकेटपटूला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटल आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाची सध्या जी काही दयनीय अवस्था होत आहे. यावर सध्या कडाडून टीका होत आहे. मात्र टीम इंडियाचे सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी टीम इंडियाचा एकप्रकारे बचावच केला आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील सध्याचा खराब फॉर्म पाहता आपल्याला धक्का बसला असून कोणा एका क्रिकेटपटूला दोष देण योग्य नसल्याचं त्यांनी म्हटल आहे. मेलबर्न आणि सिडनीतील फ्लॉप शोनंतर क्रिकेट पंडितांनी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला टीकेच लक्ष्य केलं आहे. मात्र सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी केवळ धोनीवरच अपयशाच खापर फोडणं योग्य नसल्याचं म्हटल आहे. मात्र दोन्ही टेस्टमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या बॅटिंग लाइन-अपला त्यांनी दोष दिला आहे.
दोन्हीही टेस्टमध्ये भारताला चांगली सुरूवात करून देण्यात गंभीर-सेहवाग अपयशी ठरले. तर सचिन, द्रविड आणि लक्ष्मण हे दिग्गज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. महासेंच्युरीमुळे सचिनवरही अतिरिक्त दबाव जाणवत आहे. एकूणच काय तर टीम इंडियाच्या बॅट्समनने केलेल्या खराब कामगिरीचं समर्थन करताच येणार नाही. श्रीकांत यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्याची टीम इंडिया ही सर्वोत्तम टीम आहे म्हणूनच टीमच्या खराब कामगिरीमुळे सारेचजणं आश्चर्यचकित आहेत.