महाशतकाने पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांची निराशा केली. सचिन तेंडुलकर ७३ रन्सवर आऊट झाला. सिडलने सचिनला क्लीन बोल्ड केलं. सचिनने ९८ बॉल्समध्ये ७३ रन्स केल्या होत्या. महाशतकाच्या जवळ पोहोचून पुन्हा एकदा सचिनला शतकापासून वंचित राहावं लागलं. द्रविड मात्र अजूनही मैदानावर टिकून आहे. द्रविडचंही अर्धशतक पूर्ण झालं आहे.
पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं होतं. त्यामुळे द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला. गौतम गंभीर ३ रन्सवर बाद झालयावर विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड बॅटिंग करत होते. सेहवागने आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. याचबरोबर सेहवागच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा पूर्ण झाला.
ऑस्ट्रेलियन टीमला ३५० रन्सच्या आत ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियानं आश्वासक सुरुवात केली होती. बॉलर्सनी चांगली कामगिरी केल्यानंतर आता भारतीय बॅट्समननवर भिस्त असणार आहे. टेस्टवर पकड मिळविण्यासाठी टीम इंडयाच्या बॅट्समनना जबरदस्त बॅटिंग करावी लागणार आहे.