www.24taas.com, नवी दिल्ली
क्रिकेट मॅचमधून फिक्सिंगचं भूत काही जाता जात नाही. श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्डकपमध्ये देखील फिक्सिंगचं संकट येण्याची शक्यता आहे. असंही म्हटलं जातं की, या गोष्टीसाठी दिल्ली पोलिसांनी एका महिलेला अटक देखील केली आहे.
आयसीसीच्या फिक्सिंग विरोधी युनिटला फिक्सिंग बाबत संशय आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंग होण्याची शक्यता आहे. आयसीसीला एक सुचना मिळाली आहे की, खेळाडूंना फिक्सिंगच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर मुलींचा उपयोग करण्यात येतो. एसीएसयूच्या सदस्यांनी नुकतीच दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
श्रीलंकेमध्ये १८ सप्टेंबर पासून टी-२० वर्ल्डकप सुरू होणार आहे. जो ७ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. एसीएसयू जवळ त्या महिलांची नावं आहेत, ज्या फिक्सिंगसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहेत.