www.24taas.com, चेन्नई
चेन्नई सुपर किंग्जने आज डेक्कन चार्जर्सवर १० रन्सनी विजय मिळवला. आज नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईने २० षटकात ६ गडी गमावत १६० धावा केल्या आणि डेक्कनला विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य दिले होते. हा स्कोर गाठताना डेक्कन चार्जर्स २० षटकात ५ गडी गमावत १५० धावा करू शकले.
त्याआधी तिस-या षटकात १५ धावांवर चेन्नईला पहिला धक्का बसला. एम. विजय ११ चेंडूत १४ धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या सुरेश रैनाने तडाखेबंद फलंदाजी करत पाचव्या षटकात २१ धावा पटाकवत ४७ धावा फलकावर लगावल्या. रैना १०व्या षटकात बाद झाला. त्याने २४ चेंडूत ३२ धावा केल्या. १३.१ षटकात चेन्नईची धाव संख्या ३ गडी गमावून १०९ होती. रैना तंबूत परतल्यानंतर कर्णधार धोनी क्रीजवर आला. तर दुसऱ्या टोकावर प्लेसिस उभा होता. त्याने ३५ चेंडूवर ४२ धावा लगावल्या. धोनीने २८ चेंडूत ३५ धावा केल्या. डेक्कनचा गोलंदाज प्रतापसिंह सर्वात महागडा ठरला त्याने तीन षटकात ३५ धावा दिल्या.
चेन्नईला या आधीच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवणं चेन्नईसाठी आवश्यक होतं.