केकेआरने फायनल गाठली, दिल्लीने पाठ दाखवली

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कोलकाताने फायनलमध्ये धडक मारली आहे. शाहरूखने टीम खरेदी केल्यानंतर तब्बल पाचव्यावर्षी त्याच्या टीमने फायनलमध्ये झेप घेतली आहे. कोलकत्याने १८ रनने विजय मिळवला आहे.

Updated: May 22, 2012, 11:47 PM IST

www.24taas.com, पुणे 

 

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कोलकाताने फायनलमध्ये धडक मारली आहे. शाहरूखने  टीम खरेदी केल्यानंतर तब्बल पाचव्यावर्षी त्याच्या टीमने फायनलमध्ये झेप घेतली आहे. कोलकत्याने १८ रनने विजय मिळवला आहे. कोलकाताने दिलेल्‍या १६३ धावांचा पाठलाग करताना दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍सने २० ओव्हरमध्ये ८ विकेटच्या गमावून १४४ रनच केल्‍या.

 

अनुभवी जॅक कॅलिसने रॉस टेलर आणि वेणुगोपाळ रावला बाद करून दिल्‍लीला आणखीनच संकटात टाकले. रजत भाटीयाने रावचा तर इक्‍बाल अब्‍दुल्‍लाचा कॅच घेतला आणि विजयाचा मार्ग सोपा केला. दरम्‍यान, अडचणीत सापडलेल्‍या दिल्‍लीला जयवर्धने आणि ओझाने चांगलेच सावरले होते. परंतु, ओझा पाठोपाठ जयवर्धनेही लगेचच तंबूत परतला.

 

जयवर्धनेने त्‍याने ३३ बॉलमध्ये ६ चौकारांच्‍या मदतीने ४० धावा केल्‍या. डावखुरा फिरकी गोलंदाज इक्‍बाल अब्‍दुल्‍लाने त्‍याला बाद केले. अब्‍दुल्‍लाला पुढे येऊन मारताना फसलेल्‍या जयवर्धनेने त्‍याला यष्‍टीचीत केले. पण दिल्लीला आणखी एक संधी आहे फायनलमध्ये जाण्यासाठी, त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये दिल्ली त्यासाठी प्रयत्नशील असेल.