२५ वर्षीय फुटबॉलपटूचे हद्यविकाराने निधन

इटलीमध्ये सुरू असलेल्या सिरीया ए लीगमधील सेकंड क्लास फुटबॉल मॅचदरम्यान लिव्हर्नो टीममधील डिफेंडर प्लेअर पिअरमारियो मोरोसिनी याचं मैदानावरचं फुटबॉल खेळतांना हार्ट अटॅकनं निधन झालं.

Updated: Apr 15, 2012, 06:24 PM IST

www.24taas.com, इटली

इटलीमध्ये सुरू असलेल्या सिरीया ए लीगमधील सेकंड क्लास फुटबॉल मॅचदरम्यान लिव्हर्नो टीममधील डिफेंडर प्लेअर पिअरमारियो मोरोसिनी याचं मैदानावरचं फुटबॉल खेळतांना हार्ट अटॅकनं निधन झालं.

पेस्करा येथे झालेल्या पेस्करा विरूद्ध लिव्हर्नो मॅचदरम्यान २५ वर्षीय मोरोसिनी अचानक मैदानातच कोसळला. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना मोरोसिनीचा मृत्यु झाला. या घटनेनंतर इटालियन फुटबॉल फेडरेशननं पुढील आठवड्यात होणाऱ्या सर्व मॅचेस रद्द केल्या आहेत.

मोकोसिनीला सीरिज एच्या टीम उडिनेसकडून लिवोर्नोनं लोनवर घेतलं होतं. गेल्याच महिन्यात इंग्लंडमधील क्लब बोल्टन वॉडरर्स टीममधील प्लेअर फॅब्रिस मुआंबा यालाही ग्राऊंडमध्ये ह्रद्यविकाराचा झटका आला होता आणि तो तब्बल ७८ मिनिटे बेशुद्ध होता. पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत मुआंबाला वाचवण्यात यश आलं होतं.