जागतिक क्रमवारीत चवथ्या क्रमांकावर असलेल्या सायना नेहवाल वर्ल्ड चॅम्पियन आणि वर्ल्ड नंबर वन वाँग यिहानकडून पराभूत झाली. चायनात बीडब्ल्यएफ वर्ल्ड सुपर सिरीज चॅम्पियनशीपच्या सिंगल्स फायनलमध्ये सायनाने दमदार सुरवात करत पहिला सैट १८-२१ असा जिंकला पण वाँगने यिहानने नंतरचे दोन्ही २१-१३, २१-१३ असे जिंकले. सायनाने चमकदार खेळ पण अखेरीस तिला पराभवाचा सामना करावा लागला.
यंदाच्या वर्षात स्विस ओपन सुपर सिरीज टायटल २०११ चा अपवाद वगळता सायनाला वर्ष वाईट गेले. त्यामुळे तिने ही चॅम्पियनशीपची फायनल जिंकली असती तर वर्षाची अखेर गोड तर झालीच असती पण तिने वर्ल्ड चॅम्पियनला नमविण्याचा विक्रमाची नोंदही केली असती. पण वाँगने ७२ मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवलं आणि सायनाला पराभवाची चव चाखावी लागली. सायनाने पहिल्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत ८-२ अशी आघाडी घेत सेट जिंकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये चँगने आपल्या वर्ल्ड चॅम्पियनच्या दर्जाला साजेसा खेळ करत टायटल जिंकले.