सायनाची स्वीस ओपनमध्ये बाजी

स्वित्झर्लंडमधील बॅटमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने स्वीस ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सलग दुसर्‍या वर्षी सायनाने या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.

Updated: Mar 19, 2012, 11:47 AM IST

www.24taas.com, बासेल

 

स्वित्झर्लंडमधील बॅटमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने स्वीस ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सलग दुसर्‍या वर्षी सायनाने या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.

 

22 वर्षीय सायना नेहवालचे २०१२ मधील पहिले विजेतेपद ठरले आहे. तिसर्‍या मानांकित सायनाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या शिजियांग वांगला २१-१८, २१-१६असे नमवले. भारतीय खेळाडूने ही लढत ४८ मिनिटांत जिंकली. दुसर्‍या मानांकित वांगने पहिल्या गेममध्ये चांगलीच झुंज दिली. मात्र, दुसर्‍या गेममध्ये सायनाचा दबदबा राहिला.

 

सायनाने सामन्यात ११ स्मॅश विनर्स आणि ११नेट विनर्स मारले. वांगने आठ स्मॅश विनर्स आणि सात नेट विनर्स मारले. सायना आणि वांग यांच्यात ही तिसरी लढत होती. यातील दोन सामने सायनाने जिंकले. यापूर्वी सायनाने शनिवारी उपांत्य सामन्यात जपानच्या मिनात्सू मितानीला २१-१६, २१-१८ असे पराभूत केले होते. पुरुष एकेरीचे विजेतेपद चीनच्या चेन जिन याने जिंकले. त्याने फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या ह्यून इल ली याला १४-२१,२१-९, २१-१७ अशी मात केली. इल लीने ६८ मिनिटे संघर्ष केला. मात्र, तिला अपयश आले.