सानियाला ओढ 'ऑलिम्पिक वाइल्डकाईड'ची

फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीत सानिया आणि भूपतीनं बाजी मारल्यानंतर सानिया मिर्झाला ओढ लागलीय ती लंडन ऑलिम्पिकच्या वाइल्डकार्ड प्रवेशाची... ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची ही सानियासाठी शेवटची संधी असेल.

Updated: Jun 8, 2012, 09:06 PM IST
www.24taas.com, नवी दिल्ली
फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीत सानिया आणि भूपतीनं बाजी मारल्यानंतर सानिया मिर्झाला ओढ लागलीय ती लंडन ऑलिम्पिकच्या वाइल्डकार्ड प्रवेशाची... ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची ही सानियासाठी शेवटची संधी असेल. 
सध्या भारतीय महिला टेनिसचा चेहरा बनलेली सानिया मिर्झानं महेश भूपतीच्या साथीनं दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. पण आता तिला उत्सुकता आहे लंडनमध्ये खेळण्याची. आईएफजवळ ऑलिम्पिकसाठी ६ वाइल्डकार्डस् आहेत. आणि या वाइल्डकार्डच्या साहाय्यानं ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सगळेच राष्ट्रीय संघ आपल्या खेळाडूंसाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. सानियाला फ्रेंच ओपनमध्ये मिळालेला विजय ही तिच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते.

 

सानियाला पूर्ण विश्वास आहे की लंडन ऑलिम्पिकमध्ये भूपतीबरोबर खेळण्यासाठी ती प्रवळ दावेदार आहे. मीडियाशी बोलताना तिनं म्हटलंय की ‘टेनिसमध्ये प्रत्येक दिवस हा नवा दिवस असतो, पण आम्ही हे सिद्ध करून दाखवलं की आम्हाला हरवणं तितकं सोपं नाही.’ या विजयामुळं तिला ‘वाइल्डकार्ड आपल्यालाच मिळणार’ याची पूर्ण खात्री झालीय. भूपतीनंही फ्रेंच ओपनच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, ‘आम्ही खूप चांगलं खेळतोय. आणि आम्ही जेव्हा चांगलं खेळतो तेव्हा आम्हाला हरवणं खूपच कठीण असतं. आम्ही मागच्या दोन आठवड्यांत हे सिद्ध करून दाखवलंय. सुरुवातीपासूनच आम्हीच विजयाचे मजबूत दावेदार होतो.’

 

.