शास्त्रज्ञांची शक्कल, आता राहाणार नाही टक्कल

प्रयोगशाळेत अंगावर केस नसलेल्या उंदरावर केस उगवून दाखवल्यावर शास्त्रज्ञांनी आता असा दावा केलाय, की माणसाच्या टक्कलावर पण उपचार करणं शक्य आहे. टोक्यो यूनिव्हर्सिटी ऑफ सायंसच्या टीमचं म्हणणं आहे, की त्यांनी स्टेम पेशींद्वारे केस उगवण्याचं तंत्र विकसित केलं आहे.

Updated: Apr 19, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, टोकियो

प्रयोगशाळेत अंगावर केस नसलेल्या उंदरावर केस उगवून दाखवल्यावर शास्त्रज्ञांनी आता असा दावा केलाय, की माणसाच्या टक्कलावर पण उपचार करणं शक्य आहे. टोक्यो यूनिव्हर्सिटी ऑफ सायंसच्या टीमचं म्हणणं आहे, की त्यांनी स्टेम पेशींद्वारे केस उगवण्याचं तंत्र विकसित केलं आहे.

प्रयोग करताना शास्त्रज्ञांनी स्टेम पेशी केस नसलेल्या उंदराच्या शरीरात सोडल्या. त्यानंतर उंदराच्या शरीरावर केस उगवले. स्टेम पेशींद्वारे केस उगवण्याचं तंत्र जगात पहिल्यांदाच वापरलं जात आहे. त्याला यशही मिळालं आहे. त्यामुळे  माणसाच्या डोक्यावरही केस उगवू शकतात, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

या शोध पथकाचे अध्यक्ष ताकाशी त्सुजी यांचं म्हणणं आहे, की आमचे उपचार परिणाम दाखवतात. यातून केवळ केस उगवतात असं नव्हे, तर यामुळे स्टेम पेशींचाही परिणामकारक वापर होऊ शकतो, हे सिद्ध होतंय.