www.24taas.com, टोकियो
चीनी हॅकर्सनी आता भारतीय सैन्य शोध संस्था आणि तिबेटी कार्यकर्त्यांवर आपला नेम साधला आहे. काँप्युटर सुरक्षेशी संबंधित एका संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार एका चीनी युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी हे सायबर हल्ले घडवत आहे.
टोकियोच्या ट्रेंड मायक्रो या फर्मने आपल्या २४ पानी रिपोर्टमध्ये उद्धृत केलं आहे, की लकीकॅट नामक एका हॅकिंग प्रकल्पामध्ये भारतीय सैन्य शोध संस्था आणि तिबेटी संस्थांना आपलं लक्ष्य बनवण्यात आलं आहे. जून २०११ पासून या संस्थेने जपान, भारत, तिबेट कार्यकर्त्यांवर ९० सायबर हल्ले केले आहेत.
अनेक भारतीय कंपन्या, जपानमधील ऊर्जा आणि आणि औद्योगिक संस्थां यापूर्वी अशा हॅकिंगच्या शिकार ठरल्या आहेत.