नासा पुरस्कारासाठी भारतीय शास्त्रज्ञाचं नाव स्पर्धेत

अमेरिकेच्या नासा संस्थेच्या सन्माननीय ‘नासा टेक्नोलॉजी अवॉर्ड्स’साठी उद्धव भराली या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव स्पर्धेत आहे. भराली यांना वर्ल्ड टेक्नोलॉजी नेटवर्कतर्फे दिलं जाणाऱ्या वर्ल्ड टेक्नोलॉजी अवॉर्ड 2012साठी देखील नामांकन मिळालं आहे.

Updated: Jul 10, 2012, 05:06 PM IST

www.24taas.com, गुवाहाटी

अमेरिकेच्या नासा संस्थेच्या सन्माननीय ‘नासा टेक्नोलॉजी अवॉर्ड्स’साठी उद्धव भराली या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव स्पर्धेत आहे. भराली यांना वर्ल्ड टेक्नोलॉजी नेटवर्कतर्फे दिलं जाणाऱ्या वर्ल्ड टेक्नोलॉजी अवॉर्ड 2012साठी देखील नामांकन मिळालं आहे.

आसाममधील उत्तर लखीमपूर भागात राहाणाऱ्या ४५ वर्षीय उद्धब भराली यांच्या नावावर वैश्विक स्तरावरील तब्बल ३९ पेटंट्स आहेत. पण, भराली यांचा सर्वांत गाजलेली निर्मिती म्हणजे मिनी पोमेग्रेनेट डी-सीडर म्हणजेच डाळींबाचे दाणे काढणारं लहानसं यंत्र. या यंत्रामुळे एका तासात ५०-५५ किलो डाळिंबांचे दाणे काढता येतात. बाहेरील साल आणि आतील पातळ सालीपासून डाळींबाचे सर्व दाणे सुटे करणं या त्रामुळे शक्य होतं. यात डाळिंबाचा एकही दाणा खराब होत नाही.

“नासा पुरस्कारासाठी जी २६ नावं क्वालीफाय झाली आहेत, त्यांत एक नाव माझंही आहे. माझी निर्मिती असलेलं मिनी पोमेग्रेनेट डीसीडर अमेरिकेत तसंच तुर्कस्तानात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतं. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर या यंत्राचा वापर होत आहे. मला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्यामुळे मला खूपआनंद झाला आहे.” असं भराली म्हणाले.