नव्या शोधांचा 'जुगाड'

समाज आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधून विकासाचा मूलमंत्र एल के शर्मा यांच्या 'द इंडिया आयडिया हेराल्डिंग द एरा ऑफ पाथ ब्रेकींग इनोव्हेशन्स' या पुस्तकातून देण्यात आलाय.

Updated: Jan 5, 2012, 11:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

समाज आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधून विकासाचा मूलमंत्र एल के शर्मा यांच्या 'द इंडिया आयडिया हेराल्डिंग द एरा ऑफ पाथ ब्रेकींग इनोव्हेशन्स' या पुस्तकातून देण्यात आलाय. याच पुस्तकातून कमीत कमी स्त्रोतांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून संर्वांगीण विकासाचं सूत्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी मांडलंय.

 

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. एल के शर्मा यांनी संपादीत केलेल्या 'द इंडिया आयडिया हेराल्डिंग द एरा ऑफ पाथ ब्रेकींग इनोव्हेशन्स' या पुस्तकात अशाच गरजेतून निर्माण झालेल्या शोधकार्यांवर प्रकाश टाकलाय. प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाश माशेलकर यांचं मार्गदर्शन लाभलेल्या आणि तळागाळातल्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या`नॅशनल इनोव्हेश फाऊंडेशन`नं दैनंदीन जीवनात बदल घडवून आणणाऱ्या अनेक शोधांना व्यासपीठ दिलं आहे. केरळमधील एक शाळकरी मुलीने प्रतिकूल परिस्थितीत हॅण्डलचा वापर करुन विजेविना चालणारं वॉशींग मशिन बनवलंय. कमीत कमी स्त्रोतांमधून जास्तीत जास्त फायदा मिळवून सर्वांगीण विकासाचं सूत्र त्यांनी मांडलंय.

 

टाटांची नॅनो गाडी, भाजीपाला आणि औषधं टिकवून ठेवण्यासाठी गोदरेजनं बनवलेलं नॅनो रिफ्रीजरेटर, अरविंद आय केअर सिस्टीमच्या अल्प खर्चातल्या मोतींबिदूच्या शस्त्रक्रिया अशी उदाहरणं देत माशेलकरांनी `गेटींग मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर` हा आपला विचार पटवून दिलाय. मोबाईलवरील बोलणं आणखी स्वस्त कसं होईल, कृत्रीम पाय अल्प दरात कसे उपलब्ध होतील, 'हेपटायटीस बी` लस गरजू रुग्णांना स्वस्त कशी मिळेल अशा कितीतरी मुद्यांवर संशोधन आणि त्यावर कल्पक तोडगा काढण्याची गरज माशेलकर व्यक्त करतात. शर्मा यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गरजेतून निर्माण झालेल्या कल्पकतेला `जुगाड` हा समर्पक हिंदी शब्द वापरलाय. पंजाबमध्ये शेतकरी असाच जुगाड करून आपल्या घरीच बनवलेल्या चारचाकी गाडीच्या इंजिनचा पिकाला पाणी घालण्यासाठीही वापर करतात. असेच जुगाड पुढे प्रगत तंत्रज्ञानातले अविष्कार ठरतात.