आला रे आला गुगलचा नवा स्मार्टफोन

जगातल्या निवडक अठरा देशांमध्येच टेक्नोलॉजी जगतातली बलाढ्य कंपनी नवा स्मार्टफोन गॅलेक्सी नेक्सस लाँच करणार आहे आणि तो भारतातही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आयफोनला गारद करु शकण्याची ताकद या नव्या स्मार्टफोनमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Updated: Dec 30, 2011, 12:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

जगातल्या निवडक अठरा देशांमध्येच टेक्नोलॉजी जगतातली बलाढ्य कंपनी नवा स्मार्टफोन गॅलेक्सी नेक्सस लाँच करणार आहे आणि तो भारतातही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आयफोनला गारद करु शकण्याची ताकद या नव्या स्मार्टफोनमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे.

ऍपलच्या स्मार्टफोन आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल येत्या काही दिवसातच अमेरिका, कॅनडा आणि काही निवडक युरोपियन आणि आशियाई देशांमध्ये नवा स्मार्टफोन गॅलेक्सी नेक्सस लँच करणार आहे. गुगल हा फोन भारतातही लाँच करणार आहे आणि नोंदणी करण्यासाठी खास वेब पेजही उपलब्ध करुन दिलं आहे. या पेजमुळे ग्राहकांना सर्व अपडेटस तसंच उपलब्धता याची माहिती मिळू शकेल. भारतात व्यतिरिक्त पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, फ्रान्स, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, पोर्तूगाल, अमेरिका, तैवान, थायलंड आणि नेदरलँडमध्ये स्मार्टफोन गॅलेक्सी नेक्सस लाँच करण्यात येणार आहे.

Tags: