'आकाशा'ला गवसणी

जगातील सर्वात स्वस्त ३००० रुपये किंमतीची टॅबलेट आकाशला तीन लाखाचं बुकिंग प्राप्त झालं आहे. आकाश पुढच्या महिन्यात बाजारात उपलब्ध होईल. इंग्लंडच्या डाटाविंडची निर्मिती असलेलं आकाशचं सबसिडाईझ्ड मॉडेल सध्या शाळा आणि महाविद्यालांमध्ये मोफत वितरीत करण्यात येत आहे

Updated: Nov 17, 2011, 03:03 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

जगातील सर्वात स्वस्त ३००० रुपये किंमतीची टॅबलेट आकाशला तीन लाखाचं बुकिंग प्राप्त झालं आहे. आकाश पुढच्या महिन्यात बाजारात उपलब्ध होईल. इंग्लंडच्या डाटाविंडची निर्मिती असलेलं आकाशचं सबसिडाईझ्ड मॉडेल सध्या शाळा आणि महाविद्यालांमध्ये मोफत वितरीत करण्यात येत आहे. ऍपल, सॅमसंग आणि रिलायन्स यांचे वर्चस्व असलेल्या भारतीय बाजारपेठेत आकाशला अंदाजे २,५०,००० टॅबलेटचं बुकिंग मिळालं आहे. आकाशच्या बुकिंगसाठी आगाऊ रक्कम घेण्यात आलेली नाही.

 

डाटाविंडचे सीईओ सुनितसिंग तुली यांनी सांगितलं की महिन्याला ९९ रुपयात डाटा प्लान देण्यास ऑपरेटर तयार आहे.  त्यांच्या मते कंपनीने उपलब्ध करुन दिलेली डाटा स्ट्रिमिंग टेक्नोलॉजीमुळे इंटरनेट ग्राहकांना मोफत उपलब्ध होणार आहे. डाटाविंडने सरकारच्या शैक्षणिक राष्ट्रीय अभियानला १०,००० टॅबलेटचा पुरवठा अवघ्या २२५० रुपयात केला आहे. सध्या आयआयटी, प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालये, बिटस पिलानी, टेरी विद्यापीठातील विद्यार्थी आकाशचा वापर करत आहेत. आकाशचं पुढच्या मॉडेलमध्ये टचस्क्रिन आणि दुप्पट वेगाचा प्रोसेसर असणार आहे.