www.24taas.com, पुणे
पुण्यातील शिवसेना आमदार महादेव बाबर यांना अटक करण्यात आली आहे. हडपसरमध्ये बीआरटी रस्ता बुलडोझरच्या सहाय्यानं तोडल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. बाबर यांच्यासह इतर दोघांनाही अटक कऱण्यात आली आहे.
पुण्यात वादग्रस्त बीआरटीविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं. शिवसैनिकांनी हडपसरमध्ये बुलडोझर चालवत तब्बल 400 ते 500 मीटरचा बीआरटी रूट उध्वस्त केला होता. शिवेसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. बीआरटीचा प्रकल्प पुण्यात अपयशी ठरला असून बीआरटीमुळं पुण्यात अपघातांचं प्रमाण वाढल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. केवळ हडपसर मार्गावर 90 पेक्षा जास्त अपघात झाल्याचा शिवसेनेचा दावा आहे.
पुण्यात वादग्रस्त बीआरटीविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. शिवसैनिकांनी हडपसरमध्ये बुलडोझर चालवत तब्बल ४०० ते ५०० मीटरचा बीआरटी रूट उध्वस्त केला होता. या आंदोलनामुळे नवा वाद निर्माण0 होण्याची शक्यता होती. अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना काहीही करता आले नव्हते. त्यामुळे रस्ता उखडण्यापर्यंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मजल गेली होती. शिवेसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.