विठूचा गजर.. दिवेघाटात घुमला

आनंदवारीतला आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा असतो. कारण आयुष्याच्या प्रवासातल्या चढणीचा अर्थ सांगणाऱ्या दिवेघाटाचा टप्पा आज वारकरी हरीनामाच्या बळावर लिलया पार पाडला ..

Updated: Jun 15, 2012, 11:04 PM IST

www.24taas.com, दिवेघाट

आनंदवारीतला आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा असतो. कारण आयुष्याच्या प्रवासातल्या चढणीचा अर्थ सांगणाऱ्या दिवेघाटाचा टप्पा आज वारकरी हरीनामाच्या बळावर लिलया पार पाडला ..

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवेघाटातून पंढरपूरच्या दिशेने पुढे जाते. रात्रीच्या मुक्कामानंतर कधी एकदा सकाळ होते आणि माऊंली सोबत दिवे घाटाचा मार्ग क्रमतोय यांची आस वारकऱ्यांना असते.

विठू नामाचा गजर करत भाविकांनी दिवे घाटची अवघड वाट अगदी सहजपणे पार केली, त्यामुळे दिवेघाटातील वारी ही फार अवर्णनीय अशी घटना असते. जी आज पार पडली.