पुण्यात सूस भागात गुंडाचा धुडगूस!

पुण्यात गुंडांचा हैदौस सुरुच आहे. धनकवडी, पाषाण इथल्या गुंडगिरीच्या घटना ताज्या असतानाच आता सूस गावात जमावानं धुडगूस घातला.

Updated: Apr 9, 2012, 01:54 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यात गुंडांचा हैदौस सुरुच आहे. धनकवडी, पाषाण इथल्या गुंडगिरीच्या घटना ताज्या असतानाच आता सूस गावात जमावानं धुडगूस घातला.

 

 

माजी सरपंच मुरलीधर चांदरे-पाटील आणि त्यांचे भाऊ तसेच राजेंद्र बोठे यांच्या घरातल्या वस्तू आणि वाहनांची तोडफोड केली. रविवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान ४० ते ५० युवकांच्या जमावानं हे कृत्य केलं. नंदू कोकाटे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप होतो.

 

 

जेसीबी आणि मुरुम खोदण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचं कळतंय. त्यामुळं सूस गावात भितीचं वातावरण आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस काय करतायेत, पुण्यात गुंडाचं राज्य आहे काय ? असा संतप्त सवाल पुणेकर करीत आहेत.

 

 

काही दिवसांपूर्वीच धनकवडी गावात दोन गटातल्या वैमनस्यातून वाहनं जाळण्याच्या तसेच जिवंत जाळण्याच्या संतापजनक घटना घडल्या होत्या. टोळीयुद्धात काही जणांचे बळी गेलेत. पालिका निवडणूकीनंतर पाषाणमध्येही काही घरांवर हल्ला झाला होता. या घटना ताज्या असतानाचा सूसमध्येही जमावानं धुडगूस घातल्यानं सामान्य पूणेकर संतप्त झाले आहेत.

 

 

[jwplayer mediaid="79615"]