पुण्यात कचऱ्याविरोधात आंदोलन

पुणे शहरात कचऱ्यावरून पुन्हा रणकंदनास सुरुवात झाली आहे. फुरसुंगी कचरा डेपोवरून नागरिकांनी उग्र आंदोलन सुरु केलं आहे. उरूळी देवाची आणि फुरसुंगीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोविरोधात दंड थोपटले आहेत.

Updated: Dec 21, 2011, 11:29 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पुणे शहरात कचऱ्यावरून पुन्हा रणकंदनास सुरुवात झाली आहे. फुरसुंगी कचरा डेपोवरून नागरिकांनी उग्र आंदोलन सुरु केलं आहे. उरूळी देवाची आणि फुरसुंगीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोविरोधात दंड थोपटले आहेत. कचरा डेपो रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

पुणे शहरातील दररोज १० ते १२ टन  कचरा फुरसुंगी डेपोत टाकल्या जातो, या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या आंदोलनाच्या वेळेस महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करुन डंपिंग करण्याचे आश्वासन दिले होते मात्र महापालिकेने आश्वासन पाळले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

त्यामुळे आता बेमुदत आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता पालिका याकडे कसं लक्ष देणार आहे यावर नागरिकांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.  त्यामुळे या आंदोलनाचा आधी पुणे मनपा त्याचं आश्वासन पाळणार का?