पुण्याच्या होणार 'विकास', काँग्रेस करणार 'झकास'

पुणे महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पुण्याच्या विकास आराखड्याला राज्यसरकारने मंजूरी देत, निवडणूकीसाठी चांगलीच खेळी खेळल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या पुणे विकास आराखडा मंजुरीची चर्चा पुण्यामध्ये रंगणार हे मात्र नक्की.

Updated: Dec 29, 2011, 06:34 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

पुणे महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पुण्याच्या विकास आराखड्याला राज्यसरकारने मंजूरी देत, निवडणूकीसाठी चांगलीच खेळी खेळल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या पुणे विकास आराखडा मंजुरीची चर्चा पुण्यामध्ये रंगणार हे मात्र नक्की.

पुण्य़ाच्या विकास आराखड्याला राज्यसरकारनं मंजूरी दिली आहे. पुणे शहराच्या वाढिव हद्दीचा विकास आराखडाल्या मंजूरी दिली आहे. विकास आराखड्याला मंजूरी देताना राज्य सरकारनं बीडीपीचं क्षेत्र वगळलं आहे. या विकास आराखड्यातील बीडिपीचा विषय पहिलेपासूनच वादग्रस्त ठरला आहे. त्यामुळे  हा विषय मुख्य़मंत्र्यांनी राखून ठेवला आहे. बीडिपीच्या या विषयावर येत्या दोन महिन्य़ात निर्णय घेणार असल्य़ाचं मुख्य़मंत्र्य़ांनी सांगितल आहे.

शहराजवळच्या २३ गावांचा हा विकास आराखडा  मागील ६ वर्षांपासून मंजूरीसाठी राज्य़सरकारकडे अडकला होता, मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा विकास आराखडा मंजूर केल्यानं काँग्रेस याचा राजकीय फायदा उठवणार असल्य़ाची चर्चा पुणेकरांमध्य़े रंगते आहे.