पुणेकर सिंघम

भरदार शरीरयष्टी, करवती मिशा आणि बारीक मिलिट्री कटमध्ये महेश निंबाळकर हे पुणे पोलीस दलात पोलीस नाईक आहेत. वर्षानुवर्षं फरार असलेल्या तब्बल २६ आरोपींना त्यांनी केवळ दीड महिन्यांत गजाआड केलंय.

Updated: Mar 23, 2012, 10:59 PM IST

अरुण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे

 

सिनेमात जसा गोव्यातला बाजीराव सिंघम दाखवण्यात आला होता, तसे खरोखरचे सिंघम पुण्यात आहेत. भरदार शरीरयष्टी, करवती मिशा आणि बारीक मिलिट्री कटमध्ये महेश निंबाळकर हे पुणे पोलीस दलात पोलीस नाईक आहेत. वर्षानुवर्षं फरार असलेल्या तब्बल २६ आरोपींना त्यांनी केवळ दीड महिन्यांत गजाआड केलंय आणि तेही आपलं दैनंदिन काम सांभाळून.

 

फरार आरोपींना ‘चुन चुनके’ जेरबंद करणाऱ्या या पुणेकर सिंघमवर पुणेकर भलतेच खूष आहेत. या कामगिरीबद्दल पोलीस आय़ुक्तांनीही निंबाळकरांची पाठ थोपटलीय. त्यांना प्रत्येक आरोपीसाठी ५ हजार याप्रमाणं तब्बल १ लाख ३० हजारांचं बक्षीस देण्यात आलंय.

[jwplayer mediaid="71064"]

इथून पुढंही निंबाळकरांनी आपली मोहिम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत गुन्हेगारांना 'आली रे आली, आता तुझी पाळी आली', असा इशाराच दिलाय.