पवारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली बंद!

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निषेधाच्या फेऱ्या काढत आहेत. विशेष म्हणजे या निषेध फेऱ्यांमध्ये शिख बांधवांचा मोठा सहभाग आहे. शहरात कापडपेठ, गणपती पेठ, पटेल चौक आणि इतर बाजारपेठा आणि दुकानंही बंद ठेवण्यात आलीय.

Updated: Nov 25, 2011, 08:59 AM IST

झी २४ तास वेब टीम, सांगली

 

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत बंद पाळण्यात येतोय. आंदोलकांनी सांगली शहरात बंद पाळून या हल्ल्याचा निषेध करण्याच आवाहन केलं होतं. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निषेधाच्या फेऱ्या काढत आहेत. विशेष म्हणजे या निषेध फेऱ्यांमध्ये शिख बांधवांचा मोठा सहभाग आहे. शहरात कापडपेठ, गणपती पेठ, पटेल चौक आणि इतर बाजारपेठा आणि दुकानंही बंद ठेवण्यात आलीय.