तीळगुळांच्या साथीने, हलव्याचे दागिने

नात्यांमधील स्नेह वृद्धिंगत करण्याचं औचित्य म्हणजे मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीच्या सणाला तीळगुळाएवढंच हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व आहे. सांगलीतल्या खाडीलकर कुटुंबीयांच्या तीन पिढ्या संक्रांतीचे दागिने बनवतात.

Updated: Jan 13, 2012, 08:35 PM IST

www.24taas.com, सांगली

नात्यांमधील स्नेह वृद्धिंगत करण्याचं औचित्य म्हणजे मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीच्या सणाला तीळगुळाएवढंच हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व आहे. सांगलीतल्या खाडीलकर कुटुंबीयांच्या तीन पिढ्या संक्रांतीचे दागिने बनवतात.

मकरसंक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांनी बाजार सध्या फुलला आहे. पूर्वीच्या काळी महिला हौसेनं हे दागिने घरीच तयार करत असत. पण काळानुरुप आता बाजारात हवे तसे दागिने उपलब्ध आहेत. मकरसंक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांचं महत्त्व जाणून आधुनिक काळातही या दागिन्यांनी मोठी पसंती  मिळत आहे. सांगलीतल्या मारूती चौकातल्या हेमंत खाडिलकरांच्या तीन पिढ्या संक्रातीचा हलवा आणि त्यापासून सुंदर कलात्मक दागिने तयार करतात. त्यांच्या या सुंदर दागिन्यांना देशविदेशात मोठी मागणी आहे. दोनशे रुपये ते दोन हजारांपर्यंत हे दागिने उपलब्ध आहेत.

संक्रांतीला सुनेचं तीळवण, जावयाचं प्रथम वाण आणि बाळाचं बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. आणि त्यासाठी हलव्याच्या दागिन्यांचं मोठं महत्त्व आहे. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीनिमित्त हा सण साजरा केला जातो.