www.24taas.com, पुणे
पिंपरी चिंचवड जवळ देहूगाव मध्ये गो-हत्ये विरोधात मातृभूमी दक्षता चळवळीच्या वतीन जोरदार आंदोलन सुरु करण्यात आलंय. देशात गोहत्येचं प्रमाण वाढत आहे. अनेक भागांमध्ये लपून छपून गायींची हत्या करून त्यांचे मांस विक्रीस ठेवले जात आहे. गाय ही हिंदू धर्मात पवित्र मानली जात असल्यामुळे अशा प्रकारे तिची हत्या होणं हे चिंताजनक आहे.
दूध आणि शेतीसाठी उपयोगी असणा-या प्राण्यांचं रक्षण करावं या मागणीसाठी मुबारक शेख, शांतीलाल लुणावत यांनी बेमुदत उपोषण सुरु केलंय. त्यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
या आंदोलनाला बंडा तात्या कराडकर यांनीही पाठींबा जाहीर केलाय. गोहत्या थांबवण्यासाठी सरकारन पावलं उचलावीत अशी मागणीही बंडा तात्या कराडकर यांनी केली आहे.जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असं इशारा मातृभूमी दक्षता चळवळीनं दिलाय.