...आणि राज ठाकरे घाबरले

मी महाराष्ट्राचा..महाराष्ट्र माझा.. ज्यांनी हे वाक्य राज्यात रूजवले ते राज ठाकरे. माझ्या महाराष्ट्रावर कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याला बघू घेईन, असे सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. कोणी अंगावर आले तर सोडणार नाही... माझ्या नादाला लागू नका..तुम्हाला महागात पडेल, असे बेधड वक्तव्य करणारे...भल्याभल्यांना घाम फोडणारे आणि सळो की पळो करून सोडणारे राज ठाकरे हे ही घाबरतात. त्यांनीच ही कबुली दिली आहे. निमित्त होते एका पुस्तक प्रकाशनाचे.

Updated: Jun 19, 2012, 03:54 PM IST

www.24taas.com, पुणे

 

'मी महाराष्ट्राचा..महाराष्ट्र माझा'.. ज्यांनी हे वाक्य राज्यात रूजवले ते राज ठाकरे. माझ्या महाराष्ट्रावर कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याला बघू घेईन, असे सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. कोणी अंगावर आले तर सोडणार नाही... माझ्या नादाला लागू नका..तुम्हाला महागात पडेल, असे बेधड वक्तव्य करणारे...भल्याभल्यांना घाम फोडणारे आणि सळो की पळो करून सोडणारे राज ठाकरे हे ही घाबरतात. त्यांनीच ही कबुली दिली आहे. निमित्त होते एका पुस्तक प्रकाशनाचे.

 

मंत्री कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष सुहास मंत्री लिखित ‘दोन ध्रुवांवर दोन पावलं’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन  पुण्यात सोमवारी राज ठाकरे यांच्या हस्ते झाले, या वेळी राज यांनी हे गुपीत सर्वांसमोर उघड केले आणि हस्याचे फवारे सभागृहात उडाले. ठाकरी बाणा हा राज यांच्या रक्तात भिनलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर रोखठोक आणि परखड बोलणारे व्यक्तीमत्व म्हणून राज यांच्याकडे पाहिले जाते. पुण्यात राज ठाकरे कोणाला टार्गेट करतात, याकडे लक्ष लागले होते. मात्र, पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात घडले ते उलटेच. राज  यांनी असे काही केले नाही. त्यांनी आपला अनुभव व्यक्त केला.

 

राज यांचा पहिला प्रसंग

राज म्हणाले,  मला पोहता येत नाही. पाण्यात उतरतानासुद्धा टायर घालतो. तरीही मला पोहता येत नाही. एकदा मी कोयना धरणात जमिनीखाली अडीचशे फूट गेलो होतो. लिफ्टने खाली जाताना कोयनेचा भलामोठा जलसागर. आमच्यात फक्त एक भिंत होती आणि धरणावरचा इंजिनिअर मला सांगू लागला.  सर, या ठिकाणी दिवसाला शंभर वेळा भूकंप होतो. मी म्हणालो,  असले विषय वर सर्किट हाऊसला गेल्यावर बोलू. हा घाबल्याचा प्रसंग सांगताच  जोरदार हस्सा पिकला.

 

 

राज यांचा दुसरा प्रसंग

मी ऑस्ट्रेलिया होतो.  रात्रीचे जेवण घेण्यासाठी बोटीवर गेलो होतो. त्या वेळी बोटीवरची गायिका चक्क टायटॅनिकमधले गाणे म्हणू लागली... मी म्हणालो, कोठे, काय म्हणावे, हे सुद्धा लोकांना समजत नाही. आम्ही समुद्रात आणि ती बया टायटॅनिकचे गाणे म्हणतेय. असे राज यांनी म्हणताच सभागृहात हस्सा पिकला.
राज यांचा तिसरा..

‘दोन ध्रुवांवर दोन पावलं’, हे पुस्तक पाहिल्यानंतर आता मीही पत्नीशी बोलून उत्तर व दक्षिण ध्रुवावर जायच्या तयारीला लागतो. आमचेही महाराष्ट्रात फिरणे होते; पण कोणत्या केसेस मागे लागल्या की नाही तर निवडणूक काळातच. त्यांच्या या वक्तव्यावर हास्याची लकेर उमटली.

 

राज यांचा टोला

परदेशातील लोक छोट्या गोष्टींचे मोठे भांडवल करून खिसे रिकामे करतात. राजस्थानने जुन्या राजवाड्यांची हॉटेलं करून पर्यटनाला चालना दिली. महाराष्‍ट्रात शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर मात्र पर्यटन न चालता काय उद्योग चालतात, हे सर्वज्ञात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

काय म्हणाले राज ठाकरे ऐका त्यांच्याच शब्दात...

[jwplayer mediaid="123526"]

 

.