मुलगी नको... नदीमध्येच फेकून दिली

कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आणि अनेक सामाजिक संस्थांकडून प्रयत्न होत असले तरी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये नागझिरी नदी पात्रात सात महिन्यांच्या एका मुलीचं मृतावस्थेतील अर्भक सापडलं आहे.

Updated: May 9, 2012, 01:57 PM IST

www.24taas.com, जळगाव

कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आणि अनेक सामाजिक संस्थांकडून प्रयत्न होत असले तरी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये नागझिरी नदी पात्रात सात महिन्यांच्या एका मुलीचं मृतावस्थेतील अर्भक सापडलं आहे.

बेवारसपणे अर्भक फेकून देण्यात आलं होतं. रसलपूर रस्त्यावरील नाल्याजवळ सकाळी काही जणांना अर्भक आढळून आलं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अर्भक ताब्यात घेतलं.

रावेर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जळगावात मुलांच्या तुलनेत मुलींची हजारी संख्या ८५० पेक्षा खाली आहे. तरी असे प्रकार घडत असल्यानं नक्कीच ही चिंतेची बाब आहे.