www.24taas.com, नाशिक
राज्यात उन्हाचा पारा वाढत चाललाय. त्याचा परिणाम सर्वत्र जाणवू लागलाय. पण तापत्या उन्हानं तहानलेले जीव मात्र पाण्याच्या शोधात प्राण गमावत आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या येवला वन विभागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. त्यामुळे हरणांचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. तापत्या उन्हानं जंगलात पाणी मिळेनासं झाल्यानं तहानलेली हरणं पाण्याच्या शोधात गावाकडे येऊ लागली आहेत. पण पाणी मिळणं तर दूरच, उलट पाण्याच्या शोधात विहीरीपर्यंत आलेल्या हरणांना आपला प्राण गमवावा लागतोय.
त्यामुळे आता सरकारी अनास्था टाळून या मुक्या प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी आता कृत्रिम पाणीसाठे तयार करण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांनी देखील आता मुक्या जनावरांना पाणी मिळावं याची सोय करत त्यांचा जीव वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.